about

about

Total Pageviews

Search This Blog

आमचे प्रतिनिधी

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा
( जिल्हा व तालुक्यानुसार प्रतिनिधींची यादी खाली दिलेली आहे )

फॉलोअर


संपादक मंडळ

संपादक मंडळ

दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Share it:
दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता.
चंद्रपूर / प्रतिनिधी
 वाढत्या कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा राहिलेला पेपर न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे अशी मागणी भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली. या प्रकरणी येत्या ४ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिलं आहे. दहावीचा भूगोलाचा पेपर दि. २३ मार्च रोजी घेण्यात येणार होता. मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पेपर रदद करण्यात आला. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे तसंच करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे तो पेपर घेणं शक्य नसल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून हा पेपर रद्द करून सरासरी गुण देण्यात यावे, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी प्रा. वर्षा गायकवाड यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान केली. या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
Share it:

चंद्रपूर

Post A Comment:

0 comments: