about

about

Total Pageviews

Search This Blog

आमचे प्रतिनिधी

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा
( जिल्हा व तालुक्यानुसार प्रतिनिधींची यादी खाली दिलेली आहे )

फॉलोअर


संपादक मंडळ

संपादक मंडळ

मेहकर येथे राशनकार्ड धारकाची पिळवणूक

Share it:
मेहकर येथे राशनकार्ड धारकाची  पिळवणूक
मेहकर ( प्रतिनिधी ) 
मेहकर येथे स्वस्त धान्य दुकानदारा कडून सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. स्वस्त दुकानदार सामान्य जनतेला मालं कमी देवून जास्त पैसे घेत आहे. असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा महासचिव भाई कैलाश नरवाडे यांनी मेहकर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. मेहकर येथील स्वस्त धान्य दुकानदार शासनाचे नियम धाब्यावर ठेवून मनमानी करत स्वस्त धान्य दुकान महिन्यातून एक किवा दोन दिवस उघडतात. ग्राहकाने विचारणा केल्यावर आरेरविची भाषा करतात. पुरवठा विभागाचे अधिकारी दुकानदाराला अभय देत आहेत. त्यामुळे दुकानदारांची मनमानी वाढली आहे. तसेच पुरवठा विभागात निरीक्षण अधिकारी यांच्या आशीर्वादाने खाजगी नोकर ठेवले आहेत. हे खाजगी  नोकर राशन कार्ड वर बरा अंकी नंबर टाकण्याचे २०० रुपये घेतात हा सर्व प्रकार थांबवून जनेला न्याय द्यावा अन्यथा  पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  भाई कैलाश नरवाडे यांनी मेहकर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
Share it:

Post A Comment:

0 comments: