about

about

Total Pageviews

Search This Blog

आमचे प्रतिनिधी

आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा
( जिल्हा व तालुक्यानुसार प्रतिनिधींची यादी खाली दिलेली आहे )

फॉलोअर


संपादक मंडळ

संपादक मंडळ

मुंबईतील सात महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण

Share it:

 अर्चना मेडेवार/महाराष्ट्र चीफ ब्युरो
मुंबईसारख्या मेट्रो शहरांत आता कोरोनाचा फैलाव वेगाने होतोय. यातील ९० टक्के फैलाव हा स्थानिक संसर्गातून झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संचारबंदीनंतरही रस्त्यांवर फिरणाऱ्या मुंबईकरांनी वेळीच हा धोका ओळखून दक्षता पाळायला हवी. मुंबई शहर उपनगरात शनिवारी सात महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा संसर्ग निकट संपर्कातून झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे, शनिवारी एकूण २२ कोरोना रुग्णांचे निदान झाले त्यातील १५ मुंबईतील तर सात मुंबईबाहेरील आहेत.

महापालिकेच्या वतीने सेव्हन हिल्स येथे ३५ खाटांचे विलगीकरण केंद्र आणि एच.एन.रिलायन्स रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात येत आहे. ही सुविधा नागरिकांसाठी मोफत आहे. त्याचप्रमाणे, पवई येथील एम.सी.एम.सी.आर येथे २५० खाटांचे विलगीकरण केंद्र तयार कऱण्यात आले आहे. नागरिकांना विविध किराणावस्तू तसेच भाजीपाला इ. सुविधांसाठी ऑनलाइन सेवा वापरण्याची विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

वाशी येथील एक वर्षांच्या मुलगाही कोरोना पाॅझिटिव्ह

वाशी येथील एक वर्षांच्या चिमुलकल्यालाही निकट संपर्कातून कोरोनाची लागण झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या मुलावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे आता तरी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन सोशल डिस्टन्सिंगची शिस्त पाळावी व ही परिस्थिती गांभीर्याने घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Share it:

Post A Comment:

0 comments: